Emotional

वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतोच..!


आयुष्य बनवायला तर पूर्ण आयुष्य पडलं आहे आधी ही वेळ सांभाळा जिथे आयुष्य थांबलं आहे..!


शून्य आणि वर्तुळ दिसायला   सारखे असले तरी त्यात जमीन  अस्मानाचा फरक असतो.
शून्यात आपला एकटेपणा असतो  आणि वर्तुळात आपली माणसे!


टाचणी सर्व कागदांना जोडून ठेवायला बघते....
परंतु ती सर्व कागदांना टोचत असते.....
        त्याच प्रकारे जी व्यक्ती सर्वांना जोडुन ठेवायला बघते ...
तिच व्यक्ती सर्वांच्या डोळ्यात येत असते...


जगणं अनुभवल्याशिवाय आयुष्याचे
अर्थ लावता येत नाही...🙏

संवाद संपला कि नात थांबत.
         म्हणून बोलून बघा कदाचित,
   तुमच हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल....


जीवन हा एक धुळीने माखलेला रस्ता आहे. त्यावर अगदी जपून पावले टाकली पाहिजेत...!


वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार
आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस
 यांची किंमत सारखीच असते

"पुस्तके तर वाचण्यासाठीचं आहेत,
पण कधीतरी माणसे देखील
वाचून पहावीत,
कुणास ठावूक,
ओळखीच्या माणसाची
नव्याने ओळख झाली तर..!"

येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं...
मग हे आयुष्य तरी कुणासाठी
जगायचं असतं...
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं..!




प्रतिक्रिया देण्यापेक्षा ,
प्रतिसाद द्या.
बदल निश्चित घडेल मग ती
परिस्थिती असो वा मनस्थिती.

आळस इतका सावकाश प्रवास करतो कि दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते...!


माझ्याकडे काहीही नसले
तरी चालेल !!!

पण

माझ्याबरोबर
तुमच्यासारखी माणसे असणे
हेच मि माझे भाग्य समजतो !!!
  काळजी घ्या, घरी थांबा.😷

नाते हे
पावसासारखे कधीच असू नये,
गरजल, बरसल,भिजवल
आणि निघून गेल.......
           नाते हे
नेहमी वाऱ्यासारख हवं
गडबड नाही, गोधळ नाही
     नेहमी शांत
पण कायम सोबत.......
       🙏सुप्रभात🙏


स्वभाव असा ठेवा की समोरच्या व्यक्तीला आपलं व्यसन लागलं पाहिजे आवड तर प्रत्येकात निर्माण होते..!

"जमवणं" सोपं असतं..*
आणि..
"जपणं" अवघड..
मग ती नाती असो..
किंवा माणसं.. 


वाईट बातमीला पंख असतात
तर,
शुभ बातमीला पायच नसतात
आयुष्यात जिथे पर्याय म्हणुन कुणी नसतं
तिथे
उत्तर म्हणुन स्वतःच उभं रहायच असतं...!!

कधी कधी शांतच राहणे
खुप गरजेचं असते*..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची
 उत्तरे मागायची नसतात..*
कारण *ओंजळीत पाणी तर
 पकडू शकतो.... पण टिकवून
 नाही ठेवू शकत...


जीवनात "चुका",
"अपयश" आणि
"नकार" हा प्रगतीचा भाग असतो.
कारण कोणीही यांना सामोरे न जाता
यशस्वी होऊ शकत नाही..!!
 नाचणारा मोर आणि पैशांचा जोर  कायमस्वरूपी नसतो...
काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो..!

काही नविन मिळविण्यासाठी ते गमावू नका जे आधीपासूनच तुमचं आहे...!


ह्रदयापेक्षा सर्वात चांगली 
सुपीक जागा कुठेही नाही.
कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून.... 
 पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते 🌹प्रेम असो 🤝मैत्री असो किंवा कोणावरचा राग.

No comments:

Post a Comment